Thursday, June 9, 2011

>>भेटायचे तुला राहूनच गेले..

तू भेटून गेलीस पण,
भेटायचे तुला राहूनच गेले पहा ...

प्रेम करत राहिलो तुझ्यावर सदा पण,
व्यक्त करायचे राहूनच गेले पहा  ....

अश्रूंची माझ्या झाली फुले पण,
तुला अर्पण  करायची राहूनच गेली पहा  ...

वेचत राहिली तू सुद्धा फुले रोज पण,
फुलांना गुंफणे राहूनच गेले पहा ...
                                                         
पहाट-धुके पहात राहिलो पण,
सकाळ पहायची राहूनच गेली पहा ...

पाकळ्या  दु:खांनी  झडताना पाहिल्या पण,
उमलतांना कळी पहायची राहूनच गेली पहा ....

लाटांना किनाऱ्यावर आदळताना पहिले पण,
मिलन त्यांचे पहायचे राहूनच गेले पहा ...

अजूनही तुझ्या सवे जगावसे वाटते पण,            
तुला सांगायचे राहूनच गेले पहा .....

आयुष्याची  संध्याकाळ  झाली पण,
जगायचे थोडे राहूनच गेले पहा ......
राजेश रेलकर  (08/06/2011)

No comments:

Post a Comment