>>मी माझा आणि तू तुझी फक्त..


मी माझा आणि तू तुझी फक्त ,
तरी आपण एकमेका आसक्त .....

पापण्यांच्या सावलीत विसावू दे  ,
सात जन्मांचा क्षीण घालवू दे .......

मनाने माझ्या तुझ्यासाठी केलीय साठवण  ,
ये कधी ऐकविल तुलाच तुझी एक आठवण  .....

धावून धावून थकले धमन्यातील रक्त ,
काळीज जळून खाक झाले फक्त .....

समांतर रेषा होवून चाललो आहे ,
सोबत असून आयुष्यभर भेटणार नाही फक्त ........

तळहातावरील रेषांची वळण बदलण्याची वाट आहे ,
सूर होवून तुझ्या कानात ऐकविल जे ऐकायचे आहे ......

विचारायला प्रश्न उशीर होतो आहे  ,
प्रश्न पडलाय कि , ऊत्तर काही आहे का याच फक्त?

मला वाटत 'प्रेमकथेचा ' काय होईल अंत ?
या प्रश्नच ऊत्तर तुझ्याच कडे आहे फक्त ......

मौनास आता विटलो , मी बोलत नाही फक्त ,
भीती वाटते शब्दात माझ्या वहावून जाईल प्रीत माझी फक्त ....

करू शकलो नाही प्रेम आपलं आपण व्यक्त ,
म्हणूनच उरलो मी माझा आणि तू तुझी फक्त ... तू तुझीच फक्त ......
राजेश रेलकर (२६/०४/२०११)