>>आठवण ..

आठवण तर तुलाही माझी कधी येत असेल,
आरक्त गालांवर खुदकन खळी पडत असेल ...

सहज बागेत फिरताना संध्याकाळ झाली ,
गुलाबाला पाहून तुझी आठवण आली .....

बाजूची कळी खुदकन हसून गेली,
म्हणाली ,वेड्या पहाट तर केव्हाच निघून गेली ....

बागेतल्या वेली आपसात कुजबुजतात ,
हाच तो 'प्रेमवेडा ' असे मला म्हणतात .....

ठरवले वटवृक्षाखाली घेऊ थोडा विसावा ,
तर तो विचारतो कसा , गेली कुठे ती लता ? ...

तो पहा पौर्णिमेचा चंद्र वर कसा आला ,
तोही म्हणतो मला भेटी साठी चकोर वेडा झाला ....

छान लिहितोस , खूप लिहित जा म्हणायचीस ,
लिहून खूप खूप मला ऐकव म्हणायचीस ...

लिहायला शपथ बसतो दररोज थेट ,
अश्रू पुसून टाकतात शब्द अनेक ........

एकच खंत राहून राहून वाटते ,
प्रेम आहे तुझ्यावर समजवू शकलो नाही ,
आणि ते तू कधीही उमजू शकली नाहीस .......... 
राजेश रेलकर