>>दिवसांमागून दिवस गेले..


दिवसांमागून दिवस गेले ,
कधी भेटील तुला असे झाले ..

कधी येशील सजणी तू,
थांबत नाहीत अश्रू अजून ...

सतत तुझी आठवण काढत असतात ,
डोळयापासून ओठांपर्यंत प्रवास करत असतात ....

तिकडे तुही तर सतत रडत असते,
हुंद्क्याना मात्र मला स्वप्नात ऐकवत असते ......

अजूनहि आठवते ती पहिली भेट,
गालावरच्या खळीत अडकलो होतो थेट ....

ठरवायचो बोलून टाकीन सर्व आज,
तोडून टाकीन सर्व बंधने आणि पाश ...

दिसताच तू हृदय धड-धडायचे,
बोलण्याआधीच शब्द फितूर व्हायचे ....

आजही तशीच संध्याकाळ झाली आहे ,
श्वासांची आतुरता पुन्हा वाढली आहे ......

सर्व डोळ्यानीच ठरवलं आहे आज,
नकळत हृदयाला सर्व सांगून टाकायचे तुला आज .....

ये सजणी धावत ये आज ,
हृदयाची माझ्या ऐकव तुझ्या हृदयाला साद ....

मनात माझ्या ताज महाल तयार आहे,
कधी येईल ती सारखा विचारत आहे ......

नशिबाला नव्हती मंजूर आपली साथ,
पण शपथ घेतो एक दिवस घेईलच हातात तुझा हाथ.............
राजेश रेलकर