>>वाट ...

दूर कुठेतरी पावसाची सर पडली ,
मातीचा सुगंध वाऱ्याची झुळूक घेऊन आली....

नुसती झुळूक नव्हती ती , ती तर तुझ्या आगमनाची चाहूलच होती,
रोम रोम उभे झाले, उंच मान करून तुझी वाट पाहू लागले.....

आठवणीत मन क्षणात रमले ,
अश्रुना डोळ्यांच्या कडेवर घेऊन आले .....

अश्रुंचे मोती गालावरून ओघळत नव्हते ,
जणू तुझ्या आगमनाची वाटच पाहत होते .....

मन तरुण झाले ,
तारुण्याचा उंबरठ्यावर क्षणात घेऊन गेले .....

मनातले काहूर हृदयावर आदळत होते ,
डोळे प्रत्येक आकृतीत तुला शोधत होते....

क्षणावर क्षण जात होता ,
कधी येणार ती ,परस्परांना विचारात होता......

वाट पाहत पाहत संध्याकाळ झाली ,
संध्याकाळची रात्र केव्हाच होवून गेली.....

चंद्रावरील डाग मनावर प्रतिबिंबित होवू लागले ,
शंकांच्या रुपात मनात दाटू लागले.....

वाट तुझी पाहत पापण्या देखील थकल्या ,
एकमेकींच्या मिठीत केव्हाच त्या विसावल्या .....

आली ....ती आली आहे , पहाट वाऱ्यानी नांदी दिली ,
खरच ती आली होती , स्वप्नात अलगद चालत होती ....

मखमली स्वप्नावर तिचा पाय पडला ,
हळूच मला जाग करून गेला........

कानात ती माझ्या हळूच कुजबुजली ,
वेड्या मी तर इथेच आहे ....इथेच आहे ....इथेच आहे ................
राजेश रेलकर