निरोप घेताना तुझा ,कंठ दाटून आला ,
अश्रूंचा बांध फुटून हृदय चिंब करून गेला...
तुझ्या डोळ्यात पाहताना अपराधी करून गेला,
पुन्हा कधीही न भेटण्याची सजा देऊन गेला...
कधीतरी झालेल्या चुकांची क्षमायाचना करणार,
घट्ट मिठीत तुला गुदमरून माफीनामा मिळवणार....
तुझी वाट पाहत दिवसावर दिवस गेला ,
भाबड्या आशेवर आयुष्याची संध्याकाळ करून गेला...
मरणाच्या दारात उभा आहे , पण सरणावर नाही जाणार,
मनात दाटलेल्या ढगांच्या पावसात एकदातरी तुला चिंब करणार.........राजेश रेलकर