>> स्वप्नं पाठवून दे ..


निजली असशील छान तर ,
स्वप्नं पाठवून दे ......

जागी असशील तर ,
खुशाल मनात ये .....

शृंगार करत असशील तर ,
प्रतिबिंब पाठवून दे .......

बागेत फिरत असशील तर ,
सुगंध पाठवून दे .......

पावसात भिजत असशील तर ,
वीज पाठवून दे .....

हसत खुदकन असशील तर ,
खळी पाठवून दे......

पापण्या भिजल्या असतील तर ,
दुख: पाठवून दे......

आठवण माझी येत असेल तर ,
एकांत पाठवून दे......

तुझ्या जगण्यात रंग असतील तर ,
मरणाच  माझ्या कारण तरी पाठवून दे............ 
राजेश रेलकर (२४/०४/२०११)