>>क्षण भारावलेले..

क्षण ते किती भारावलेले होते,
स्वप्नांच्या हिंदोळ्यावर अलगद झुलत होते.....

आठवणीने त्या आजही डोळे डब-डबतात,
अश्रूंचा तुझ्या, हिशोब मला मागतात ..

कळत-नकळत तुला दुखुवून गेलो,
मनातले माझ्या मनातच गोठवून गेलो...

न बोलता सर्व काही सांगून गेलीस,
जाता -जाता हृदय शिवून गेलीस ...

मला काही सांगायचे होते,
तुला काही ऐकायचे होते,
हि भावना तशीच ठेवून गेलीस..

दूर जातांना तुला दुरूनच पाहत राहिलो,
गेल्यावर तुला वेड्यासारखा शोधत राहिलो..

मंद हवेच्या झुळूकेवर आजही स्वार होवून येतेस,
स्वप्नात येवून " तेच ऐकायचे" म्हणतेस..

वेडी आहेस, कोण म्हणत प्रेम व्यक्त करायचं असत,
ते तर आपल्यासारख मनातल्या मनात फक्त कुर्वाळायचं असत.... 
राजेश रेलकर(09/03/2011)