तू हि माझी तळमळ कधी तरी समजून घे ,
मनावर झालेल्या जखमातून वाहणाऱ्या भावनांची भळभळ उमजून घे ......
कुणाला समजावू शकलो नाही त्या भावना तुला समजवू दे ,
सर्वस्व हरून जिंकल्याचा सोहळा साजरा करू दे ........
डोळ्यांचा डोळ्यांशी झालेला लपंडाव पुन्हा खेळू दे ,
नाही व्यक्त करू शकलो ते प्रेम आता तरी व्यक्त करू दे .........
बोलत असताना तुला फक्त न्याहाळू दे ,
केवड्याचा सुगंध तुझ्या केसात दरवळू दे .....
राधा होवून बावरी एकदा साद दे ,
कृष्ण होवून रंगात तुझ्या न्हाऊ दे .....
कुशीत शिरून तुझ्या विसावू दे ,
आयुष्यभराची विश्रांती क्षणभर घेऊ दे .......
मीठीत घेऊन तुला घट्ट गुदमरवू दे ,
हृदयाच्या स्पंदनांची देवाण- घेवाण होवू दे ......
प्रेमाच्या बंधनात पुन्हा मला गुंतू दे ,
"पहिले प्रेम कधी विसरत नसतात वेडे "तुला समजवू दे,तुला समजवू तदे..
राजेश रेलकर (24/04/2011)