>>ती पहाट ..

अलाह्ददायक सकाळी तुझ्या केसांच्या सळसळण्याने जाग आली,
त्यात गुंतून पडल्याची चटकन जाणीव झाली...

पहुडल्या पहुडल्या तुला न्याहाळत राहिलो ,
रात्रीच्या धुंद क्षणांत, क्षणभर हरवून गेलो...

सोनेरी किरण मखमली केसांना चकाकी देत होते,
कनक कोण ? तू कि मी हे विचारात होते....

रेशमी मिठीत तुझ्या, तो स्पर्श हवा हवासा,
मोर पिसांहून हि अधिक मखमली वाटला ....

खट्याळ बट ललाटावर खेळत होती,
मी हि अशीच, जणू खुणावत होती ...

कोमजलेला मोगरा तृप्त दिसत होता,
लटक्या संघर्षाची साक्ष देत होता...

तुझ्या सौंदर्यावर मला गर्व झाला,
क्षणभर मलाच मी कुबेर समजून गेला .....
राजेश रेलकर (10/03/2011).