तू सोबतीला असती तर ,
जगायला आवडलं असत मला......
एक गुलाब दिला असता तर ,
मनाच्या पेटीत ठेवला असता त्याला ......
एकदाच जवळ घे म्हटल असत तर ,
पेटत्या श्वासांना ऐकवल असत तुला ....
जीवनाच्या होडीत बसली असती तर ,
सुखाचा किनारा शोधायला आवडलं असत मला ......
मिठीत माझ्या विसावली असती तर ,
भिजल्या नसत्या पापण्या माझ्या .....
तू माझ्या सोबतीला असती तर ,
श्रीमंत भिकारी , मी नसता झाला ....
तुझा पदर जवळ असता तर ,
खूप रडायला आवडल असत मला ....
तू जवळ असती तर ,
वारा आठवणिचा सतावू शकला नसता मला .....
माझ्या डोळ्यांची भाषा समजली असती तर ,
काही बोलण्याची गरजच नसती पडली तुला ......
तू जवळ असती तर ,
घेतला असता शेवटचा स्श्वास मी सुखाचा ...............
राजेश रेलकर (२३/ ०४/२०११)