Monday, May 30, 2011

>>सपाट तळहाताची गोष्ट..

उदास आज संध्याकाळ  वाटे ,
भरलेले मन ओसंडून वाहे ....

दिवस उजाणा रात्र  भयाण दाटे ,
दु:खापेक्षा मदिराच अधिक जवळ वाटे ...

उगवता सूर्य नजरेस न कधी दिसे ,
मावळता दिवस नजरेतून न हटे ...

तारुण्यात तिच्यासाठी 'ताज' बांधावासा वाटे,
ती निघून गेली ,आता संगमरवर माती फक्त भासे ...

प्रीत माझी का सोडून गेली? प्रश्न मला पडे ,
तिची चूक नाही 'आपलच नशीब खोट असे '...

सुंदर जीवन नरक मला भासे ,
स्वकीयांची फसवणूक जिव्हारी फार लागे .....

नात्यांची बंधने  सैल जणू वाटे ,
जिकडे तिकडे नर मादीचा खेळ सुरु असे...

नशिबाने मलाच का फसवावे असे ?                  
हिशोब आयुष्याचा  आज करावासा वाटे ....

करायला बसलो हिशोब तर गणित माझे चुके ,
बेरजेचे  ऊत्तर शून्य फक्त येते  ...            

सरणावरील  कलेवर सर्वात सुखी भासे ,
'अंतिम सत्य ' काय असते आता मला कळे  ...

विचारले संतापून नशिबाला "माझ्याच बाबतीत का असे होते ?"
म्हणाले , मूर्ख बघ  जरा भाळावर 'विश्वासघात ' लिहिला असे,
फक्त विश्वासघातच लिहिला असे ....
राजेश रेलकर (३०/०५/२०११)






    

No comments:

Post a Comment