Friday, May 27, 2011

>>अस कधी होत का ?

अस कधी होत का ?

प्राजक्ताचा सडा वेचताना मोगऱ्याचा गजरा  आठवतो का कधी ?

रणरणत्या ग्रीष्मात मेघम्हलार आळवतो का कुणी ?

दुखाच नखं लागूनही काळजाची तडफड होत नाही का कधी ?

सत्व जपताना आठवांचा ठेवा हरवतात का कुणी ?

प्रेमाच्या मोरपिसाला कुर्वाळताना खुडत का कुणी ?  

विरहात जळताना पापणीला पापणी लागते का कधी ?

गालावरून ओघळणारे अश्रू  आटतात का कधी ?

देव्हाऱ्यातल्या देवाचा राग करतात का कुणी ?

संसारात रमलो तरी रेशीम धागा तोडतात का कुणी ?

डोळ्यांना  डोळे भेटल्यावर खोट लाजतात का कुणी ?

न लाजताच गालावरची खळी उमलते का कधी ?

एकांतात कितीही रडलो तरी हसरा मुखवटा लावूच ना आम्ही ?

जगायचं नाही म्हंटल  तरी जगतच राहू ना आम्ही?

हि मनाची कोडी सुटतील का कुणाला कधी ?

जगाची रीत मोडून नवीन वाटा शोधू ना कधी ... 

सांग प्रिये ,नवीन वाटा शोधू ना कधी....

राजेश रेलकर (२९/०५/२०११ )




 

No comments:

Post a Comment