Wednesday, June 15, 2011

>>शब्द वेगळे भावना त्याच

पाहू नका वळून सावल्यांना,
खेळ तोच खेळतात डाव नवा मांडून....

उडवू नका स्वप्नांच्या पतंगा पावसात,
फाटेल भरारी घेण्याच्या आत ...

देवू नका काळजाला सहज ,
विसरेल परत करण्या कुणी उगाच.....

चलू नका अंतर इतके सवे,
परतणे जेथून शक्य नसे ....

टाकू नका तिच्या पदरात चंद्र आणून ,
चांदण्यांना  काळोखात एकटे सोडून ......

मखमली स्वप्न देवू नका तिला उधार ,
व्याज सोडाच मुद्दल पण विसराल ......

लिहू नका जिवलगा  प्रेम पत्र,
निष्ठुर परतावा अवश्य  मिळवाल....

ज्याचा त्याचा अनुभव  वेगळा ,
शब्द वेगळे भावना त्याच पहा .... 
राजेश रेलकर (१६/०६/२०११)

No comments:

Post a Comment