तू माझी कविता ,
तूच माझा अंतरा....
तू माझे शब्द,
तूच माझी प्रेरणा...
तू माझी प्रीत ,
तूच आठवणींची रीघ...
तू माझे संगीत ,
तूच वसंतातले गीत ....
तू माझ्या मनातली आठवण ,
तूच डोळ्यांतली साठवण....
तू माझी कथा ,
तूच मनाची व्यथा ....
तू माझी वाट ,
तूच पहिले किरण , तूच पहिली पहाट ......
राजेश रेलकर(१०/०५/२०११)
No comments:
Post a Comment