प्रेम हे नेहमीच खर असत ,
भावना नेहमीच शुद्ध असतात ....
हवं तर विचार तुझ्या मनाला ,
एकांतात समजावेल ते तुला ....
व्याकुळ मन कधी फार भावूक होतं ,
निव्डूंगावरच प्रेम करायला धजावत ...
भावनांचा कधी उद्रेक होतो ,
समुद्र गिळून टाकावसा वाटतो...
मौनातून माझ्या आक्रोश प्रकटतो ,
मात्र माझा मलाच ऐकू येतो....
आभाळ भरून आले कि मनही भरून येत ,
सरींच्या आधी मनच कोसळत....
कधी आठवांच्या सरीमध्ये तुही न्हावून जाशील,
चिंब भिजून निश्चितच मला येवून बिलगशील ....
वादळ उठत राहतील ,पाऊस कोसळत राहील ,
तरी प्रीत मात्र आपली सदा तेवत राहील .......
राजेश रेलकर (११/०५/२०११)
भावना नेहमीच शुद्ध असतात ....
हवं तर विचार तुझ्या मनाला ,
एकांतात समजावेल ते तुला ....
व्याकुळ मन कधी फार भावूक होतं ,
निव्डूंगावरच प्रेम करायला धजावत ...
भावनांचा कधी उद्रेक होतो ,
समुद्र गिळून टाकावसा वाटतो...
मौनातून माझ्या आक्रोश प्रकटतो ,
मात्र माझा मलाच ऐकू येतो....
आभाळ भरून आले कि मनही भरून येत ,
सरींच्या आधी मनच कोसळत....
कधी आठवांच्या सरीमध्ये तुही न्हावून जाशील,
चिंब भिजून निश्चितच मला येवून बिलगशील ....
वादळ उठत राहतील ,पाऊस कोसळत राहील ,
तरी प्रीत मात्र आपली सदा तेवत राहील .......
राजेश रेलकर (११/०५/२०११)
No comments:
Post a Comment