Wednesday, May 25, 2011

>>असावे असे प्रेम..

असावे असे प्रेम असावे,
सावलीसारखी साथ देणारे ....

रिमझिम पावसासारखे ,
मातीला तृप्त करून सुघंध देणारे ....

थोडे रुसवे ,खूप प्रेम असणारे ,
भेटीस आतुर ,प्रीत स्पर्शातून सांगणारे .....

जगा वेगळे ,कुणाला न घाबरणारे,
लहान चुका करणारे ,मोठ्या मनाने सामावून घेणारे ....

किनाऱ्याला कवेत घेणाऱ्या सागरासारखे ,
शिंपल्याचा आधार घेणाऱ्या मोतीसारखे ....

पौर्णिमेच्या चंद्रासारखे ,चांदण्यांशी गुजगोष्टी करणारे ,
पौर्णिमेपर्यंत आतुरतेने चंद्राची वाट पाहणाऱ्या चांदण्यांसारखे .....

वृक्षाला बिलगणाऱ्या वेलीसारखे,
एकाचे दुख: दुसऱ्याचे अश्रू होवून वाहणारे....

जन्मो- जन्मी साथ निभावणारे ,सात जन्माला न पुरणारे,
अथांग सागरासारखे कधीही न आटणारे,असावे असे प्रेम असावे.........
राजेश रेलकर (२२/०५/२०११)

1 comment: