Tuesday, May 24, 2011

>>तो पाउस...

हातात तुझा हात घेताच बाहेर वीज कडाडली ,
घेताच तुला मिठीत कमनीय तू थरारली......

श्रावणातील पहिली सर ती बरसली,
तुला नि मला जवळ करून गेली .....

तू होती ती, कि नुकतीच उमललेली कळी ,
फुलांच्या गर्दीत उमलून बावरलेली कळी .....

गालावर हसून खुललेली खळी,
खोल डोहात बुडवून मला गेली ....

अधर थरथरत होते, मला जवळ घे म्हणत होते ,
श्वास श्वासात घुसमळत होता , मंद मातीचा सुवास हृदयात पोहचवत होता....

पहिल्या पावसात निसर्ग खुलतो म्हणतात ,
मीच निसर्गाला अपवाद कसा राहणार ......

डोळ्यांनी डोळ्यांचा इशारा समजला,
घडायचे विपरीत तेच घडवून गेला ...

नंतर काही कळलेच नाही केव्हा पाऊस थांबला,
मला तर परमोच्च सुख देऊन गेला ...

ओल्या पानावर दवबिंदू होते पहुडलेले,
मला सर्व काही मिळाले सांगत जणू होते .....

आजही पाऊस तसाच कोसळणार ,
पावसात त्या मी खूप चिंब भिजणार ,
शोधून हरवलेले क्षण , आसवे माझी लपवणार .....

कोसळणाऱ्या सरीला मी जरूर विचारणार ,
किती सहन करू मी हा दुरावा ,
कधी देईल ती थरथरणाऱ्या मनाला या विसावा ......... 
राजेश रेलकर (13/03/20011)

No comments:

Post a Comment