Tuesday, May 24, 2011

>>तू आणि मी प्रेम केलं...

तू आणि मी प्रेम केलं होतं छान,
मुकं प्रेम , शब्दच नव्हते त्यात फार .....

तुझ्याशिवाय कुणाच स्वप्न कधी पाहिलंच नाही ,
माहित असून, संसाराचे स्वप्न वास्तवात येणार नाही......

तो ताटातुटीचा क्षणच का आला ?
क्षणात हृदयाच्या चिंधड्या करून गेला .....

जगायचं नाही आता , ठरवलं होत मनी मी माझ्या ,
पण मग कुणी दाखविली असती, माझ्या चितेची वाट तुला ?....

तू निघून गेलीस तेव्हा खूप- खूप रडलो ,
आसवं गिळत - गिळत आजवर जगलो .....

पाझरणाऱ्या त्या आसवांनी रूधय चिंब झालं ,
आता फक्त हृदयचं रडत, आसवं गोठवून गेलं......

आता उरलो आहे "प्रेमवीर " असा छान,
जो जगतो आहे फक्त आठवणींवर तुझ्या आज ....

कधीतरी झुगारून देशील का बंधने सांग ?
करशील का पूर्ण माझी "अंतिम इच्छा " आज ?.....

एकदा तरी तुझ्या खांद्यावर डोक टेकवायचं आहे,
खूप- खूप रडून तुझा पदर भिजवायचा आहे .....

विश्वास आहे मला , मी गेल्यावर एकदा तरी तू रडशील ,
माझ्या नावाने दररोज दिवा तू नक्कीच लावशील....

उरलेलं आयुष: तुझी आस घेऊन जगणार आहे,
पण काळजी करू नकोस, पुढच्या जन्मी मी फक्त तुझा आणि तुझाच होणार आहे...... 
राजेश रेलकर (२२/०४/२०११ )

1 comment:

  1. खूप छान कविता आहे ....मला "तू निघून गेलीस तेव्हा खूप- खूप रडलो ,
    आसवं गिळत - गिळत आजवर जगलो ....." आणि "
    एकदा तरी तुझ्या खांद्यावर डोक टेकवायचं आहे,
    खूप- खूप रडून तुझा पदर भिजवायचा आहे ....." या ओळी डोळ्यात पाणी आणून गेल्या.

    ReplyDelete