Tuesday, May 24, 2011

>>आता मला कळले..

आता मला कळले कि प्रकाश काय असतो ,
नारायण काळोखावर मात का करतो ......

आता मला कळले कि नावाडी काय असतो ,
क्षितिजापल्याड जाण्याचा हट्ट का करतो ......

आता मला कळले कि मौन काय असते,
मनावरील चरे कुणाच्या ध्यानात का आणायचे नसते .....

आता मला कळले कि विचारांची दंगल का माजते ,
गोंधळलेल्या मनाने हृदयाला का विचारायचे नसते ....

आता मला कळले कि डोळ्यात पाणी का साचते ,
सर्व बांध तोडून नदी का वाहते......

आता मला कळले कि वाळवी जमिनीतच का राहते ,
मनातली घुसमट मनातच का साचते .........

आता मला कळले कि स्त्री काय असते ,
त्यागाच्या नावावर अशी का वागते ........

आता मला कळले कि नाते काय असते ,
प्रीती च्या नावावर रिते का असते .........

आता मला कळले कि "पहिले प्रेम " काय असते ,
मनात ठेवायचे असते पण ओठांवर का आणायचे नसते ........ 
राजेश रेलकर (२५/०४/२०११)

No comments:

Post a Comment