वाचू नकोस माझ्या कविता ,
दुख होईल फार तुला .....
शिरू नकोस खोलात कवितेच्या ,
भावनांच्या भोवरयात बुडण्याच भय राहील तुला ......
वाचू नकोस माझ्या कविता ,
अधर तुझे हसतील तुला ......
वाचू नकोस माझ्या कविता ,
खळीच गालावरची लाजवेल तुला ......
कधी वाचण्याचा प्रयत्न करतो मी माझ्या कविता ,
तर प्रेमात पडतो मीच माझ्या ......
वाचू नकोस लपून माझ्या कविता ,
केव्हा ताबा घेतील मनाचा कळणार सुद्धा नाही तुला ....
प्रयत्न करू नकोस शब्द - गुंता सोडवण्याचा ,
मन पुन्हा गुंतेल तुझे माझ्यात ......
वाचू नकोस माझ्या कविता ,
पापण्या रुसतील तुझ्या .......
लावू नकोस अर्थ माझ्या कवितेचा ,
जाईल हरवून तुझी निद्रा......
हव तर , क्षितिजापल्याड जावून वाच एखादी कविता ,
तिथे फक्त राहू तू , मी आणि फक्त माझीच कविता , फक्त माझीच कविता.... राजेश रेलकर (२७/०४/२०११)

No comments:
Post a Comment