Wednesday, August 3, 2011

>>अश्रू ....

गालावरून ओघळणाऱ्या अश्रूंना वेळ नाही थांबायला,
उगाच शोधत बसतो मी त्यांच्या उगमाना ......  

थांबलेले क्षण  पुनः  पुनः समोर उभे ठाकतात ,
पुढे गेलेल्या अश्रूंना उगमाकडे ओढतात ....

श्रावण सरीत पुनः तिची आठवण झाली ,
सगळी माझी सुखं ती केव्हाच  घेवून गेली .... 

तिलाही माझी आठवण येत असेल का कधी ?
निरोप खुशालीचा पाठवावासा  वाटत नसेल का कधी ?....  

आठवणींच्या गाठी  घट्ट अश्या पडल्या ,
उसवता उसवता काळीज फाडून गेल्या .....

दिवसावर दिवस अन वर्षावर वर्ष निघून गेली ,
अबोल माझी प्रीत आठवांचा थर रचून गेली ......

काळजाला झालेल्या जखमा ताज्या अजून वाटतात ,
सहानभूती साठी आतुरतेने वाट तुझी पाहतात ....

तू येशील नक्की विश्वास आहे भाबड्या मनाला ,
येशील तेव्हा पंचारती घेवून सर्व उभे राहतील स्वागताला .......
राजेश रेलकर (01/08/2011)